नाशकात(Nashik) आम्ही किमान 4-5 जणांना तरी विचारलं, की इथली सगळ्यात भारी मिसळ कोणती??
सगळ्यांचं उत्तर एकच – “ते पंचवटी कारंजापाशी कि नई अंबिका मिसळ(Ambika Misal) म्हणून आहे बघा. एकदम बेश्ट बघा!”
रिक्षा करून तिथे पोहोचलो तर हि तोबा गर्दी. साधारण पंधरावा वगैरे नंबर होता आमचा. पण थांबलो रांगेत(पुण्यातील टिळक रोड SBI Branch चा गेली 12 वर्षांचा अनुभव असल्याचा हा फायदाच म्हणावा लागेल खरंतर).
साधारण अर्ध्या तासात टेबल मिळालं. मिसळीची ऑर्डर पण देऊन झाली. पण ऑर्डर घेणारा माणूस मिसळ सर्व्ह करणार्या माणसाला ज्या प्रकारे मोठ्यानं कोणत्या टेबलवरची ऑर्डर आहे हे सांगत होता ते फारच भारी होतं.
Usually टेबल्सना नंबर दिलेले असतात आणि त्यानुसार ऑर्डर घेतल्या जातात. पण अंबिका मिसळ(Ambika Misal) मध्ये मला थोडा वेगळा प्रकार पहायला मिळाला.
- देव्हार्याखाली 4 मिसळ – 2 दही – 2 पापड
- बेसिनच्या समोर 2 मिसळ – 1 दही
- काउंटर शेजारी सिंगल दही – मिसळ – पापड आणि एक पावजोडी Extra.
Finally आमची ऑर्डर आमच्या टेबलवर अवतरली. काळ्या मसालाची मिसळ मी आयुष्यात प्रथमच Try केली आणि खरं सांगायचं तर मला प्रचंड आवडली.
NOTE :
COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309
Scheduled Tours :
Batch No. | Date | Starting Point | Occupancy |
---|---|---|---|
Follow us on :
- Facebook : www.facebook.com/unadkya
- Instagram : www.instagram.com/unadkya
- YouTube : www.youtube.com/unadkya
- Twitter : www.twitter.com/unadkya