Japanese Food Blog by Kirti Aphale
खाण्यासाठी जन्म आपुला असं म्हणतात ते काही वावगं नाही. वेगवेगळे पदार्थ बनवणे, हॉटेल्स मधे जाऊन खाणे, Indian आणि International डिशेस चे Fusion करणे अशा जमातीतले मी आणि माझा नवरा. कामानिमित्त जपानला जाण्याचा योग आल्यावर तिथेही आमची खाबूमोशायगिरी चालूच राहिली. Vegetarian असल्यामुळे काही निर्बंध लागले पण ते काही आमच्या खादाडखाऊ स्वभावाला रोकू शकले नाहीत. अशा काही खास पदार्थांचे मी थोडक्यात वर्णन केलय. आशा करते तुम्हाला नक्की आवडेल.
1. ओकोनोमीयाकी
Japanese लोकाांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणजे “ओकोनोमीयाकी”. नाव जरा विचित्रच आहे. “ओकोनोमी” म्हणजे तुमच्या आवडीचे आणि “याकी” म्हणजे ग्रिल्ड. सोप्या भाषेत साांगायचे झाले तर त्यांचा उताप्पा.. मैद्याच्या पीठात कोबी, कांद्याची पात, आले, अंडे, फिश, स्क्वीड, ऑक्टोपस, पोर्क एकत्र करुन बनवलेले पॅनकेक. यात मैद्याऐवजी नुडल्स पण वापरतात. मेयोनीज आणि एक विशीष्ट सॉस या डिशला चव देतात. कधी खाण्याचा योग आला तर नक्की खाऊन बघा .
P.S.- हा पदार्थ व्हेज मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
2. तेम्पुरा
आपल्यात कसा पाऊस पडू लागला की गरमागरम कांदाभजींची आठवण होते तशी Japanese लोकांनाही होते.
फक्त त्यांचा पदार्थ “तेम्पुरा”. बेसन पिठाऐवजी हे लोक मैदा व अंडे वापरतात. सीफूड आणि ब्रोकोली, मशरूम, कांदा, बटाटा, पेपर अशा भाज्या पिठात एकत्र करुन त्याच्या भजी करतात. जास्त वेळ न घेणारा व सहज शक्य असा हा पदार्थ.
3. वाराबीमोची
हा एक थंड, रबरी आणि जेली सारखा गोड पदार्थ आहे. वाराबी म्हणजे स्टार्च. जमीनीखालील झाडाच्या खोडापासून हे स्टार्च तयार करतात. खरंतर याला काहीच चव नसते. यासोबत सोयाबीन पाउडर आणि ब्राउन शुगर सिरप देतात. म्हणून हा गोड लागतो. Japanese मुलांचा उन्हाळी दिवसांमधील हा आवडीचा पदार्थ आहे.
4. ताकोयाकी
ताकोयाकीबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. नेटवर याचे बरेच Video देखील दिसतात. जपानमधे ओकोनोमीयाकी, ताकोयाकी, इकायाकी असे बरेच याकी नावाचे पदार्थ आहेत. आपण सुरुवातीला ओकोनोमीयाकी बद्दल माहिती घेतली. आता ताकोयाकीबद्दल जाणून घेऊ.
ताको म्हणजे Japanese भाषेत ऑक्टोपस आणि याकी म्हणजे ग्रिल्ड. याला ऑक्टोपसबॉल्स असे पण म्हणतात. पीठामधे तेलावर परतलेले ऑक्टोपस, तेंकासु(जपान मधली बुंदी), कांद्याची पात, आले मिक्स करतात आणि त्याचे अप्पे करतात. नेहमीप्रमाणे या पदार्थाची मजा त्याच्या सॉसमधे आहे. ताकोयाकी सॉस, मायोनीज, सीवीड आणि ड्राइड फ़िश फ्लेक्स सोबत हे बॉल्स सर्व्ह करतात. जपानमधे हे खूप प्रसिद्ध स्ट्रीटफूड आहे.
5. मिताराशी कुशी दांगो
नाव अवघड असले तरी पदार्थ सोपा आहे. जपानी लोक तांदूळ आणि त्या पासून बनणारे पदार्थ भरपूर खातात. या कुटुंबातीलच हा एक सदस्य. ज्यांना मऊ भात आवडतो त्यांना ही डिश नक्की आवडेल. थोडी गोड आणि चिकट अशी भाताची उकड असते. याचे छोटे डम्पलिंगस थोडे भाजून स्वीट सोया सॅासमधे बुडवून सर्व्ह करतात. एका स्टिकला ४ ते ५ डम्पलिंगस अडकवतात. या डिशचे वॅाट्सॲपलादेखील स्टीकर उपलब्ध आहे.
6. ओनिगिरी
सुशी तुम्हाला माहिती असेल. कदाचित खाल्ली देखील असेल. तिचाच हा भाऊ. साहजिकच हा पदार्थ भातापासून बनवतात. Japanese दुकानात हा वेगवेगळ्या फिलिंग्स आणि फ्लेवर्स मधे मिळतो. त्रिकोणी, गोल अशा आकारात भात सीवीड मधे बाांधला जातो. याच्या फिलिंग्समधे सल्मोन, ड्राइड आणि स्मोक्ड ट्यूना, जपानी पिकल्स आणि काही मसाल्यांचा वापर होतो. ओनिगिरी मुळे भात कुठेही कसाही सहजरित्या खाता येतो. म्हणूनच हा जपानमधील खूप प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.
अशा असंख्य खाद्यपदार्थांनी जपानी लोकांचा आहार परिपूर्ण होतो. संपूर्ण जगासोबात जर त्यांच्या सरासरी आयुची तुलना केली तर ते सर्वात पुढे आहेत. याचे रहस्य या आहारातच असेल नाही का?
– किर्ती आफळे.
NOTE :
COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309
Scheduled Tours :
Batch No. | Date | Starting Point | Occupancy |
---|---|---|---|
Follow us on :
- Facebook : www.facebook.com/unadkya
- Instagram : www.instagram.com/unadkya
- YouTube : www.youtube.com/unadkya
- Twitter : www.twitter.com/unadkya