Pavbhaji Saga by Pratik Ghaisas
तुम्ही मला घरी जेवायला बोलावता..
अगदी प्रेमाने, जिव्हाळ्याने वगैरे..
मस्तपैकी छान छान पदार्थ खाऊ घालता..
हे सगळं मला मान्य आहे..
त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे..
पण ते सारखं सारखं जिकडं जावं तिकडं आपलं पावभाजी पावभाजी..
म्हणजे बघा ना,
बंड्याची मुंज – पावभाजी..
चिऊचं बारसं – पावभाजी..
झंप्याचं केळवण – पावभाजी..
नाम्याच्या लग्नाचं रिसेप्शन – पावभाजी..
चिंकी-मन्याच्या लग्नाचा वाढदिवस – पावभाजी..
गणूच्या घराची वास्तुशांत – पावभाजी..
ह्याच्या वाढदिवसाची पार्टी – पावभाजी..
त्याच्या प्रमोशनची पार्टी – पावभाजी..
आजोबांची साठीशांत – पावभाजी..
आजीचा सहस्रचंद्रदर्शनसोहळा – पावभाजी..
अहो,
दसरा-दिवाळी – पावभाजी..
पाडवा-भाऊबीज – पावभाजी..
अगदी ख्रिसमस-न्यू ईयरसुद्धा – पावभाजी..
अहो इतकंच काय..
आपल्याकडे कोणी पाहुणे आले तरी – पावभाजी..
आणि आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तरी – पावभाजी..
अहो जिकडे जाऊ तिकडे : पावभाजी – पावभाजी – पावभाजी..
म्हणून म्हणतो,
माझ्या लाडक्या बहिणींनो,
माझ्या प्रेमळ वहिनींनो,
आत्या-काकवा-मावश्यांमधल्या वात्सल्यपूर्ण रुचकर गृहिणींनो..
अरे छान इडली-डोसे करा..
किंवा बिर्याणी-पराठे करा..
मोदक-पुरणपोळ्या तर कराच करा..
पण तो पावभाजीचा भडिमार थांबवा हो!!
आणि खरं सांगायचं तर मी वरणभात, तूप, मीठ, लिंबू आणि चवीला म्हणून मिरचीच्या लोणच्याचा खार इतका साधा माणूस आहे हो..!!
आणि अगदीच तुम्ही पानामध्ये पापड किंवा कुर्डई वाढायचा प्रयत्न केलात तरी मी नाही म्हणून तुमचं मन नाही हो दुखावणार..!!
पण ती पावभाजी आवरा हो!!
कारण ह्या Post मधे जेवढ्या वेळा पावभाजी हा शब्द आला असेल त्यापेक्षा किंबहुना ४-५ वेळेपेक्षाही जास्तवेळा नुस्त्या ह्या चालू Calendar वर्षात मी पावभाजी खाल्ली असेन..!!
काल तर ज्यांच्याकडे ब्राह्मण म्हणून जेवावयास गेलेलो तिथे पण पावभाजी पाहिल्यावर त्यांना मला हे सांगावं लागलं की,”अहो मला आमच्या फ्यामिली डॅाक्टरांनी पावभाजी वर्ज्य सांगितलिये..!!”
तब जाके उन्होंने मुझे पावभाजी का आग्रह करना छोड़ दिया..!!
असो, तर मुद्दा हा आहे की, ह्या पावभाजीच्या Concentration camps मधून कृपया मला मुक्त करा..
मैं मरना नहीं चाहता..!!
शेवटी, पावभाजीची पुण्यातली माझी आवडती २ ठिकाणं सांगतो आणि हे पावभाजी पुराण इथेच संपवतो..!! 😛
-(पावभाजाळलेला) प्रतिक ज. घैसास…
#Khaabuumoshaay
NOTE :
COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309
Scheduled Tours :
Batch No. | Date | Starting Point | Occupancy |
---|---|---|---|
Follow us on :
- Facebook : www.facebook.com/unadkya
- Instagram : www.instagram.com/unadkya
- YouTube : www.youtube.com/unadkya
- Twitter : www.twitter.com/unadkya
Pull Apart Pavbhaji at Timo, Chandani Chowk, Pune.