Jambhrun Trails, Jambhrun, Ratnagiri

Jambhrun Trails, Ratnagiri
Jambhrun Trails, Ratnagiri

‘जांभरूण ट्रेल्स’ जांभरूण, रत्नागिरी….

अनुभवा आडवाटेचे कोकण…

कोकणातील रत्नागिरी शहरापासून अवघ्या २० किमी. अंतरावर जैवविविधतेने नटलेल्या खोऱ्यात वसलेलं “जांभरूण” नावाचं सुंदर गाव आहे. येथील “जांभरूण ट्रेल्स” या आमच्या इको टुरिझम सेंटरमध्ये वर्षभर वाहत्या ओढ्यालगत कोकणचे वैशिष्ट असणाऱ्या लाल चिऱ्याच्या दगडात बांधलेली २ प्रशस्त कोकणी कॉटेजेस पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. १०० वर्ष जुने पारंपरिक कोकणी घर देखील आपल्या स्वागताला सज्ज आहे. त्याच बरोबर नारळी पोफळीच्या बागेतली सुसज्ज ‘कोकणी हट’ सुद्धा आपली वाट बघते आहे.

“जांभरूण ट्रेल्स” मध्ये एका वेळी २५ पर्यटकांची सोय होऊ शकते. खोल्यांमधील प्रशस्त बेड्स, उत्तम वेस्टर्न टॉयलेट्स, वॉकिंग वॉर्डरोब, गरम पाणी, इन्व्हर्टर बॅक-अप अशा सर्व आधुनिक सुविधांसह शेणाने सारवलेली जमीन व लाल कौलारू छप्पर, चिऱ्याच्या पाखाड्या असे पारंपरिक कोकणी वातावरण आपण इथे सर्वत्र अनुभवू शकता.
आम्ही आपल्या आवडीनुसार उत्तम शाकाहारी आणि मांसाहारी जेवण देतो. तुम्हाला फक्त तुमची वैयक्तिक सामग्री घेऊन इथे पर्यटनासाठी यायचं आहे.

आम्ही इथे कोकणी कॉटेजेस साठी प्रति व्यक्ती प्रतिदिन ₹ 2200/- इतके शुल्क आकारतो ज्यामध्ये आपले कॉटेज मधील वास्तव्य, अमर्यादित चहा/कॉफीसह सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळेचे शाकाहारी (व्हेज) जेवण यांचा समावेश आहे. उपलब्धतेनुसार व आवडीनुसार आपण मांसाहार (non-veg) जेवण घेऊ शकता ज्यात चिकन बरोबरच चविष्ट स्थानिक माशांचा स्वादही घेता येतो. फक्त त्याचे अतिरिक्त शुल्क आकारले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

कोकणी हट साठी प्रती व्यक्ती प्रतिदिनी ₹ 2200/-/- आणि कोकणी घरातील वास्तव्यासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिनी ₹1800/- इतके शुल्क आकारले जाते. यात सकाळचा नाश्ता आणि २ व्हेज जेवणांसह अमर्यादित चहा/कॉफी समाविष्ट आहे.

आपण आपल्या कुटुंबासहीत अथवा मित्रमंडळीसह कमीत कमी ४ किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा ग्रुप बनवून आलात व किमान ३ ते ४ दिवसांच्या प्रवासाची योजना आखलीत तर तुमचा जांभरूणचा मुक्काम अतिशय संस्मरणीय ठरेल याची आम्ही खात्री देतो.

येथे आम्ही पर्यटकांना ३ ते ४ ट्रेल्ससाठी घेऊन जातो ज्यात हेरिटेज वॉक, टेंपल टूर, नेचर ट्रेल, गर्द आमराईची सफर आणि हेरिटेज साईट असलेल्या कातळशिल्पांना दिलेली अविस्मरणीय भेट या गोष्टी समाविष्ट आहेत. यामुळे तुमची सहल फक्त सहल न राहता एक आनंद यात्रा बनून जाते….

सुंदर आणि शांत आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे, कोळीसरे मंदिर जांभरूणच्या जवळच आहेत जी चुकवू नयेत अशी ठिकाणे आहेत.
तर….चला!तयारी करा आणि या जांभरूणला!!

🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🌴

Kokani Cottages 👇

Kokani hut 👇

Kokani house 👇