Pandavkathi Homestay, Mundhar, Guhagar

Pandavkathi Homestay
Pandavkathi Homestay

🙏नमस्कार🙏

आपला पांडवकाठी होम स्टे गुहागर तालुक्यात मुंढर या गावी आहे. मुंढर हे गुहागर किंवा गणपतीपुळे सारखं टुरिस्ट डेस्टिनेशन नाही. इथे आपण शांतता, निसर्ग आणि कोकणातलं स्वतःच घर ह्या थीमला धरून होम स्टे केलाय. सध्या आपण माडीवरच्या दोन रूम आणि खालची एक डबल रूम पर्यटकांना देतो. वरच्या दोन रूमला कौलारू छत आहे. कौलारू घराची मजा अनुभवण्यासाठी मुद्दामच मधे सिलिंग किंवा इतर काही केलेले नाही. मात्र पाहुण्यांच्या safety साठी कोने आणि भिंतींना कौलं जिथे जुळतात ते सिमेंटने व्यवस्थित पॅक केलं आहे. या दोन्ही रूमना मोठी बाल्कनी आहे. लाकडी आरामखुर्च्यात बसून समोरच्या नारळी पोफळीच्या बागेचा आणि डोंगराचा view सुंदर दिसतो.

कौलांतून गरम हवा बाहेर जाते आणि चक्क उन्हाळ्यातही गरम होत नाही. पहाटे तर पांघरुण घ्यावेसे वाटते. दोन्ही खोल्या प्रशस्त असून तीन मोठ्या खिडक्या आहेत जेणेकरून दिवसभर भरपूर प्रकाश आणि हवा खेळती राहते. बाल्कनीचा दरवाजा उघडला तर पंख्याची आवश्यकता भासत नाही. एका खोलीचे क्षेत्रफळ 300 चौ फु असून बाल्कनी सुद्धा तेवढीच मोठी आहे. खोलीत सर्व जुन्या पद्धतीचे सागवानी फर्निचर असून संडास बाथरूममध्ये सर्व आधुनिक सोयी सुविधा आहेत. या खोलीत 3+ 2 अशी 5 माणसे आरामात राहू शकतात. (1 डबल बेड+ 1 सिंगल बेड अशी रूमची क्षमता असून 2 गाद्या सुद्धा व्यवस्थित राहतात.)

खालच्या तळमजल्यावरील खोली म्हणजे खरोखरच एक कोकणी घराचा अर्धा भागच आहे. ज्यात शेणाने सारवलेली मोठी पडवी, झोपाळा, हॉल आणि एक बेडरूम आहे. या छोटेखानी घर कम खोलीत हॉलमध्ये 4 आणि आतल्या छोट्या रूम मध्ये 3 अशी 7 माणसे राहू शकतात. मात्र ही रूम आपण फक्त मोठ्या ग्रुप साठीच देतो जे पूर्ण घर घेतात. पडवीतून समोरच्या डोंगराचा आणि बागेचा अतिशय सुंदर देखावा दिसतो.

हे झालं राहण्याच्या बाबतीत. आता हा होम स्टे कुणासाठी आहे ते सांगतो. कोकणातली बहुतेक कुटुंब कालौघात आपले कोकणातले मूळ गाव सोडून मुंबई पुण्यासारख्या शहरात कायमची स्थायिक झाली. कालांतराने त्यांचे कोकणातले नामोनिशाण नाहीसे झाले. आजही जेव्हा त्यांची पुढची पिढी कोकणात येते तेव्हा त्याना वाटते आपलेही कोकणात जांभ्या दगडाचे कौलारू घर असावे, परसात आंब्या फणसाची झाडे असावीत, नारळी पोफळीची बाग असावी. तर हा आपला होम स्टे अशाच लोकांसाठी आहे. इथे आपल्याला शांत, unexplored कोकण अनुभवता येईल, कोकणी टुमदार घरात आपल्या स्वतःच घर असल्यासारखं राहता येईल. घरच्यासारखं जेवण मिळेल. इथल्या शांततेत स्वतःसाठी वेळ मिळेल. लेखकांना आपली प्रतिभा लेखणीने कागदावर उतरवता येईल.

दिवसभर फिरून फक्त रात्री विसावण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी हा होम स्टे नाही. आपण चार दिवस इथे राहून मात्र जवळची ठिकाणे जरूर explore करू शकता. हेदवी, वेळणेश्वर, गुहागर ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे इथून 30 km च्या त्रिज्येत आहेत.

आता उन्हाळ्यात लोक विचारतात AC आहे का? आम्हांला AC शिवाय झोप येत नाही! तर मुळात इथे वर्षातले जास्तीत जास्त 2 महिने गरम होतं. 15 एप्रिल ते 15 जून किंवा पाऊस पडेपर्यंत. आणि जरी पाहुण्यांच्या आग्रहाखातर AC लावला तर शहरात जसं आयुष्य जगता तसंच इथं येऊन जगाल! इथे पहाटे 5 वाजल्यापासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो तो तुम्ही AC लावून दारं खिडक्या बंद करून कसा काय ऐकणार? मोर पहाटे केकरव करतात, PITTA शीळ घालतो त्यांच्या आवाजाने जाग यायला हवी की नेहमीच्या शहरी पद्धतीने? AC लावावा म्हटलं की आता जसा आतूनही कौलारू घराचा आनंद मिळतोय तो मधल्या सिलिंगमुळे घेता येणार नाही. आता जशी उष्ण हवा कौलांच्या फटीतून बाहेर जाते आणि खिडक्यांमधून बाहेरची थंड हवा आत येते ती नैसर्गिक कुलिंग सिस्टीम बाद होईल. दिवसा वारा असतोच आणि! आणि हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा येतातच कधी कधी वारा पडतो आणि खूप गरम होतं. पण निसर्गाच्या कुशीत राहायचं आणि तेही त्याच्याशी एकरूप होऊन म्हणजे फार आनंद मिळतो तसं थोडं दुःखही मिळणारच!!

पावसाळ्यात पाऊस सेट होईपर्यंत असंख्य किडे लाईटवर येतात त्याना घाबरून किंवा त्यांची घाण वाटून जमत नाही! निसर्ग म्हटला की हे सर्व घटक सोबत येणं अपरिहार्य आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या निसर्गप्रेमीसाठी हा होम स्टे आहे.

Tariff :-

₹3000/- per room (capacity 3 persons) per day
Extra person – ₹500/- per day (maximum 5 persons can be accommodated in two rooms)

अटी व नियम :-

१. Smoking and drinking not allowed.
२. बुकिंग करताना 100% ऍडव्हान्स रक्कम जमा करावी लागेल. त्याशिवाय बुकिंग कन्फर्म केले जाणार नाही.
३. Cancellation charges:
– Peak Season time – (April, May, November and December) – 20% of booking amount
– Off season – 10% of booking amount
४. Pets not allowed
५. Check in time – 12pm, check out – 10 am
६. जेवण आणि नाश्ता याबाबत किमान 2 दिवस आगाऊ कळवावे. अन्यथा जे उपलब्ध असेल तेच serve केले जाईल.