आसाम : दिब्रुगढ – बोगीबील ब्रिज – शिवासागर – जोरहाट
Assam : Dibrugadh – Bogibeel Bridge – Sivasagar – Jorhat

भाग पहिला – दिनांक १२/१०/२०१९

Technical issue चं कारण देत SpiceJet वाल्यांनी तासा-दोनतासांनी का होईना पण ह्या 5 पायऱ्यावाल्या 2×2 सीटींग अरेंजमेंट असलेल्या अगदी शिवशाही बससारख्या अगदीच सो-सो विमानात आम्हाला बसवलं आणि सुरू झाला आमचा कोलकाता(Kolkata) ते दिब्रुगढचा(Dibrugadh) प्रवास.

कोलकाता ते दिब्रुगढ वालं आमचं Spicejet चं विमान

बराच वेळ खुडबुड खुडबुड करून शेवटी आमचं SpiceJet चं विमान आकाशात झेपावलं.. आणि काहीच वेळात दिसू लागली हि आसामची जीवनदायिनी – ब्रम्हपुत्रा नदी.. तसेच वृक्षवेलींनी नटलेल्या हिरव्यागार धरतीवर दुलई पसरलेले ढग..

आणि आम्ही उनाडक्या करत करत दिब्रुगढला (Dibrugadh) एकदाचे पोहोचलो. मी आधी Mobile चा Flight Mode बंद करून पाहिला आणि BSNL तसेच JIO दोन्हीला रेंज पाहून माझा जीव भांड्यात पडला. मी पटकन आमच्या Guide ला कॉल केला. तो काल संध्याकाळीच Guwahati ,Assam हून निघून जवळजवळ 12 तास प्रवास करत दिब्रुगढला (Dibrugadh) पोहोचला होता.. त्याच्याशी आणि Driver शी प्राथमिक बोलणं झाल्यावर कळलं की ते दोघं पहाटे 5 वाजताच इथे पोहोचलेले आणि त्यांची 2-2.5 तास छान झोप सुद्धा झाली होती..

दिब्रुगढ विमानतळ (Dibrugadh Airport, Assam)

दिब्रुगढ(Dibrugadh)ला पोहोचल्यावर आधी आम्ही एका Local Restaurant मधे बुफे Breakfast वर यथेच्छ ताव मारला.. तसं पाहिलं तर ते हॉटेल जरा महागच होतं पण पोटात इतके कावळे ओरडत होते कि बाकीचा विचार करत बसण्यात काही अर्थ नव्हता.. आम्ही आमचं खाणं-पिणं आवरलं आणि तिथून निघालो ते साधारण 35-40 किमी अंतरावर असलेल्या आणि नुकतंच आपल्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या Bogibeel Bridge ला मनसोक्त पाहण्यासाठी..

बोगीबील – बोगी म्हणजे शुभ्र आणि बील म्हणजे पाणथळ प्रदेश

Assamese मध्ये बोगीबील(Bogibeel Bridge) ह्या शब्दाची फोड साधारण अशी कि, बोगी म्हणजे शुभ्र आणि बील म्हणजे पाणथळ प्रदेश (White Wetland). 4.94 किमी लांब असलेल्या ह्या पूलाची खासियत अशी कि हा Doubledecker पूल आहे.. म्हणजे खाली दुहेरी Railway मार्ग आणि त्यावरून जाणारा तीनपदरी वाहनांचा मार्ग.. आजच्या काळातील एक Engineering Marvel असणारा हा पूल हा Asia मधील दुसरा सर्वात मोठा पूल आहे..
आणि ह्या पूलाचा सगळ्यात जास्त फायदा हा आपल्या Indian Army ला होत आहे कारण पूर्वी Dibrugarh हून Arunachal Pradesh ला जाताना Guwahati, Assam मार्गे 500किमी चा वळसा घालून जावं लागत असे तेच अंतर ह्या पूलामूळे आता साधारण 100किमी मध्ये कापले जाते..

आमचा आजचा मुक्काम हा Jorhat, Assam या ठिकाणी असणार होता आणि तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला बोगीबील पासून अजून किमान 150 किमी अंतर पार करायचे होते म्हणून आम्ही Bogibeel bridge पाशी साधारण एक तासभर sightseeing करून जोरहाटच्या दिशेने पुढच्या प्रवासाला निघालो..

Mumbai हून Kolkata Airport ला पोहोचल्यावर असलेला 4 तासांचा Layover, त्यामुळे एकतर रात्रभर झोप नाही आणि त्यात परत Dibrugarh ला केलेला तगडा Breakfast हि समीकरणं जुळून येऊन आम्ही सगळेच जण पेंगुळलेल्या अवस्थेतच होतो.. काहीकाहीशी गावं पार करून जात असताना आमच्या गाडीने मुख्य बाह्यवळण रस्ता सोडून एक छोटासा गावात जाणारा रस्ता पकडला.. आणि आम्ही आलो ते Sivasagar ह्या ठिकाणी.. इथलं शंकर-महादेवाचं मंदिर पहायला..

Sivasagar येथील शंकराचं मंदिर हे इथल्या अहोम साम्राज्याच्या(Ahom kingdom) राजा सिवा सिंघ (aka Sutanphaa) ह्याने आपल्या राणी अंबिका (दुसरी बायको) हिच्यासाठी बांधून घेतलं. सोबतच भगवान विष्णू आणि देवी दुर्गा ह्यांची देखील त्याच आवारात मंदिरं उभारली.

ह्या मंदिरांची उभारणी साधारण 1731-1738 मध्ये झाली असून उंची 32मीटर आणि परिघ 59मीटर आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच इथली रथयात्रा देखील फार प्रसिद्ध आहे.

sivasagar येथील मंदिरामागे असलेला हा शांत व रमणीय तलाव आणि त्याच्या पाण्यात दिसणारे प्रतिबिंब.

तलातल घर म्हणजे आसामच्या अहोम साम्राज्याचा राजवाडा. असं म्हणतात कि हा राजवाडा सातमजली होता. तीन मजले जमिनीखाली आणि चार मजले जमिनीवर अशा प्रकारची ह्या राजवाड्याची वास्तूसंरचना होती..
शत्रूचा हल्ला झालाच आणि काहीच पर्याय नसेल तर पळ काढता यावा म्हणून 2 भुयारी मार्ग होते त्यातला एक जवळपास 16 किमी लांब आहे. हे सर्व बांधकाम 1696 ते 1714 साली झालं आहे.

आदल्या दिवशी रात्रभर प्रवास झाल्याने आमच्या ट्रीपचा Dibrugadh ते Jorhat, Assam हा पहिला दिवस फक्त प्रवास – डुलकी – साईटसीईंग – प्रवास – डुलकी – दुपारचे जेवण – वामकुक्षी – साईटसीईंग – पुन्हा काही डुलक्या – आणि शेवटी एकदाचं आमचं हॉटेल जिरोनी(जिरोनी ह्या Assamese शब्दाचा मराठी अर्थ हा आराम असा आहे) मध्ये संध्याकाळी 5.30 वाजता पोहोचलो.

खरंतर 5 वाजल्यापासूनच सारं आकाश संधीप्रकाशात न्हाऊन निघालं होतं. पण फोटो काढण्यासाठी मोबाईलची Battery आणि अंगात खरं तर त्राणच शिल्लक राहिले नव्हते; त्यामुळे ती संध्याकाळ मनात साठवून आम्ही साधारण आठच्या सुमारास जेवण झाल्यावर पटकन झोपी गेलो.
कारण उद्याचा दिवस हा आणखी एक चिरकाल असा अनुभव घेऊन येणार होता.. आमची भेट होणार होती ती एका अवलियाशी.. ज्याने…………

(सगळं आत्ताच नाही सांगत..)
पुन्हा भेटूयात पुढच्या भागात .. पहात रहा आमच्या उनाडक्या याच ठिकाणी..

– प्रतिक घैसास

NOTE :

COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309

Scheduled Tours :

Batch No.DateStarting PointOccupancy

Follow us on :

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like