Kutumbe’s Homestay, Harihareshwar

Kutumbe's Homestay
Kutumbe’s Homestay

हरिहरेश्वर..

दक्षिण काशी म्हणून सुपरिचित असलेलं कोंकणातील एक आल्हाददायक ठिकाण. हिरव्यागार वनश्रीचा आणि अमर्याद अशा सागराचा वरदहस्त लाभलेलं प्राचीन तीर्थक्षेत्र! श्रीहरिहरेश्वर मंदिर आणि सुंदर समुद्रकिनारा ही खास आकर्षणे असल्याने पर्यटकांची सदैव रीघ ही हरिहरेश्वरी क्षेत्री असतेच!

एक- दोन दिवसाची Short Trip असो किंवा आठवडाभराची भटकंती असो; मित्रमैत्रिणींबरोबर उनाडक्या असो वा कुटुंबाबरोबर Family Tour असो. हल्ली कोंकणकिनाऱ्यांनाच बहुतेक प्राधान्य दिले जाते! निळाशार अथांग समुद्र, विस्तृत नद्या, नारळीपोफळीच्या बागा सर्वांचीच मने वेधून घेतात. हरिहरेश्वर देखील याला अपवाद नव्हे! त्यातूनच श्रीहरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्रही असल्याने मंदिरातही भाविकांची गर्दी सदैव असते. देवदर्शन आणि भटकंती असे दोन्ही हेतू इकडे येऊन पर्यटक साध्य करून घेतात. म्हणूनच हरिहरेश्वरास येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी राहायचे कुठे , जेवायचे काय हे प्रश्न तर नक्कीच पडणार! याचे अचूक उत्तर म्हणजे

Kutumbe’s Homestay !

राहण्यासह भोजनापर्यंत सर्व उत्तम व्यवस्थेसाठी Kutumbe’s Homestay हा हरिहरेश्वरमधील एक उत्तम पर्याय आहे! स्वच्छ परिसर, रुचकर जेवण, सर्व सोयी-सुविधा, नारळ-सुपारीची आकर्षक बाग, त्यामागेच हाकेच्या अंतरावर असणारा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि मुख्यतः ‘अतिथि देवो भव:|’ हे तत्व समोर ठेऊन अतिशय घरगुती वातावरणात प्रेमाने आदरातिथ्य करणारी माणसे ही या ठिकाणाची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.

सर्व सोयीसुविधांसह Kutumbe’s Homestay पर्यटकांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व सुविधा याठिकाणी एकाच छताखाली पर्यटकांना मिळू शकते. मोदक-सोलकढी सारखे खास कोंकणी पदार्थांसह अनेक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेणे सहज शक्य आहे.

A.C. आणि Non A.C. अशा दोन्ही प्रकारे सेवा या ठिकाणी मिळू शकते. Per Person package अशी सुविधा या ठिकाणी आहे. संपूर्ण दिवसाचे चहा नाश्ता जेवण आणि निवास या सर्व सुविधेसाठी एक दिवसाचे एका माणसाचे ₹2000 इतके शुल्क आकारले जाते. AC Room ची सुविधा आवश्यक असल्यास एका खोलीसाठी एका दिवसाचे ₹1000 इतके शुल्क अधिक द्यावे लागते. या सर्व शुल्काच्या मोबदल्यात Kutumbe’s Homestay उत्कृष्ट दर्जाची सुविधा पर्यटकांना पुरवते यात कोणतही साशंकता नाही!

चला तर मग… लवकर Planning करा. Kutumbe’s Homestay तुमच्या स्वागतास आणि तुमची Trip अविस्मरणीय करण्यास उत्सुक आहे!