South Island, New Zealand Unadkya

South Island म्हणजे न्यूझीलंड (New Zealand) चा स्वर्ग. Dream destination for travelers..! बाबा आले तेंव्हा अचानक पंकजने ही ट्रिप बुक करून टाकली. लेकीच्या वाढदिवसाचं निमित्त काढलं आणि तिला surprise द्यायचं ठरवलं. तिला समजलंच म्हणा ते ना सांगता.

New Zealand ट्रिप बुक झाल्यापासून ते सुरु होईपर्यंत चा एकही दिवस नीट झोप लागली नाही. वारंवार तिथल्या scenic जागा आम्ही आधीच youtube वर पाहून ठेवल्या. कुठे काय-काय पाहायचं सगळं प्लानिंग करून ठेवलं, शेवटची गोष्ट “Weather Forecast”.

बुकिंग करताना cloudy होतं महिन्याभरापूर्वी, ट्रिप ला जाण्याआधी पाहिलं तर “rainy” दाखवत होतं. पाल चुकचुकली मनात पण पटकन विचार झटकून टाकला. भरपूर सामान झालं. उबदार कपड्यांमध्ये आता Raingear ही घ्यावे लागले सोबत.

प्रवास सुरु झाला. Queenstown, Te Anau, Milford Sound, Glenorchy, Wanaka, Hawea, Queenstown असा sequence लावलेला itinerary मध्ये. Queenstown ला उतरलो तेंव्हाच आमचं स्वागत पावसानी केलं. विमानातून उतरताना जमिनीकडून वर पाहत गेले तेंव्हा काही क्षण स्तब्ध च झाले.समोरच दृश्य अतुलनीय होतं. इतकं नितळ, polish केल्यासारखं सौन्दर्य मी आजवर पाहिलं नव्हतं.

Rental कार घेतली आणि “Te Anau” ला निघालो. रिमझिम पाऊस, मधेच उन्हं असा खेळ पाहत वेळ कसा गेला कळलंच नाही. तिथे पोचल्यावर मात्र विरस झाला. पावसाने चांगलीच हजेरी लावली. रूम च्या बाहेरही पडत येईना. पहिला दिवस वाया गेला. दुसऱ्या दिवशीची Milford Sound ची टूर बुक केलेली. तीही दरड कोसळल्यामुळे कॅन्सल झाली.

२ दिवस नुसते गाडीमध्ये बसून फिरून आलो. फोटो काढण्यापुरते खाली उतरत होतो. पुढचा प्लॅन पावसामुळे बदलायचा ठरवला आम्ही. आता आधी Queenstown ला जायचं ठरवलं.

South Island मध्ये रोड नेटवर्क तुरळक आहे. आम्ही निघालो तेंव्हा गूगल map वर पावसामुळे सगळीकडे delays दिसत होते. एरवी “Te Anau” ते Queenstown १.५ तास असेल तर आज ४ तास दाखवत होतं. हाही निम्मा दिवस प्रवासातच जाणार हे समजावलं मनाशी.

७ दिवसाच्या ट्रीपमधले २.५ दिवस already वाया गेले होते. गाडीत बसून मी घरी पाहिलेले videos आठवत होते. “Milford Sound” मिळालं नाही पाहायला याचा खेद शब्दात व्यक्त होणारा नव्हता. पंकज आणि बाबा तरीही hopeful वाटत होते. मुली मागे गाणी म्हणत, कधी भांडत, कधी झोपत वेळ घालवत होत्या. २-२.५ तास झाले असतील.

Gore नावाच्या गावात पोचलो तेंव्हा भूक लागलेली आणि एक ब्रेक घ्यावा म्हणून गावात गाडी थांबवली. Google map चेक केला आणि हादरलोच. Queenstown कडे जाण्याचा मार्ग heavy rains मुळे बंद केला होता काही वेळेपूर्वीच. काहीतरी चुकत असेल पाहायला म्हणून Gore च्या visitor centre मध्ये गेलो. आमच्यासाखे काही जण आधीच आले होते तिथे. सगळेच थोडे उदास, साशंक दिसत होते. Attendant ला विचारता तिने अजून एक धक्का दिला. Gore पासून निघणारे सर्व मार्ग बंद केले गेले होते!!

आम्हाला भानावर यायला काही वेळ गेला. तिला विचारल्यावर तिने Gore मधेच राहायचा सल्ला दिला. अशा ऐनवेळी, सगळे हॉटेल्स बंद,छटंसं गाव त्यामुळे तिथे तसेही options फार कमी होते आधीच. शेवटी तिने खूप प्रयत्न करून आमच्यासाठी एक जागा शोधली. ते एक private house होतं. कसेबसे पाण्यामधून गाडी चालवत त्या घरापर्यंत पोचलो एकदाचे.

छोटंसं टुमदार घर आणि आजूबाजूला फक्त निसर्ग! मोठ्ठा Ranch, त्यामध्ये उनाड फिरणारी सुंदर हरणं आणि एकुलतं एक दिमाखदार शहामृग! स्वप्नातच असल्याचा भास झाला.

दारावर थाप मारली.. एकदा.. दोनदा.. वाट पहिली थोडी.. आतून हळूहळू चालत येण्याचा आवाज आला. मी थोडी साशंक होते. कोण असेल? कसं असेल? कसा विश्वास ठेवायचा असे बरेच प्रश्न मनात असतानाच दार उघडलं गेलं..
समोर उभी होती ती.

“Margaret”

“Hi, I am Margaret.”
गोल गुबगुबीत थोडीशी वेन्धळी, हसूच आलं पहिल्यांदा पाहिल्यावर..
वय वर्ष ६५ पण चेहेऱ्यावरचे भाव मात्र ५ वर्षाच्या मुलीसारखे. निरागस, कोवळे आणि कमालीचे Positive..
भीती , शंका निघून गेली तिला पाहिल्यावर. एखादा माणूस पहिल्यांदाच भेटतो पण जवळचा वाटतो. तसंच काहीसं..

आत आल्यावर आधी तिने मस्त कॉफी करून दिली. थोड्या गप्पा झाल्यावर घर दाखवायला सुरुवात केली. आम्हाला दोन रूम्स मिळाल्या होत्या झोपायला. एकात बाबा आणि पंकज, दुसर्यामध्ये मी आणि मुली.. दोन्ही रूम्स एक्दम स्वच्छ. बेड्स ना electric blanckets लावलेले. आधीच गाद्या उबदार झाल्या होत्या त्यामुळे. दारावर दोन पडदे. एक गडद एक फिकट. भिंतीवरचे दिवे अगदी मंद आणि त्या प्रकाशात दिसणाऱ्या फ्रेम्स. Margaret च्या तरुणपणीच्या काळामधल्या. समोरच्या कपाटामध्ये खूप सारे शु बॉक्सेस decorate करून ठेवले होते. प्रत्येक बॉक्स वर वेगवेगळ्या इव्हेंट्स च्या नोंदी आणि आतमध्ये त्याचे photographs होते. तिच्या सर्व जिवलगांना या घरामध्ये अस्तित्व दिलं होत तिने. छान सेटअप केला होता एकंदरीतच.

Shoe boxes नाव व नोंदीसहित

थोडं स्थिरावल्यावर आम्ही सगळेच बाहेर लिविंग रूम मध्ये आलो. मार्गारेट च घर बघण्यासारखं होत. बरेच वर्ष ही इथे एकटीच राहत होती. Kitchen मध्ये अतिशय मोजकं सामान.. कपाटं ready to eat पॅकेट्स नी भरलेली. एका कोपऱ्यामध्ये औषधांच्या बाटल्या आणि prescriptions. Margaret ला लागणाऱ्या अगदी माफक गरजेच्या वस्तू होत्या तिथे.

Dining रूम मध्ये एका कोपऱ्यात छोट्या टीपॉय वर ठेवलेला एक जुना रेडिओ. जेवणाच्या टेबल वर अस्ताव्यस्त पसरलेले कागद आणि मधोमध ती सोडवत असलेली शब्दकोडी. समोर प्रशस्त खिडकी आणि त्यातून बाहेर दिसणारे ते डौलदार शहामृग. लिविंग रूम छोटीच होती. २ सोफे २ Seater. एका कोपऱ्यात जुना बॉक्स tv आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये antique piano. बाबा आदमच्या जमान्यातला.

Margaret खूप बोलकी होती. एका शाळेत vice Principal म्हणून बरीच वर्ष काम करून retire झालेली. आता घरी फक्त Piano चे lessons द्यायची अधूनमधून. अजूनही शाळेसाठी voluntary काम करत असावी असं तिच्या dining table वरच्या कागदांकडे पाहून वाटलं.
तिने सोडवलेलं शब्दकोडं मी पुन्हा पुन्हा वाचून पाहिलं. अचूक शब्द लिहिले होते. कुठेही खाडाखोड नाही. डायरेक्ट पेन नेच solve केलेलं. अक्षर एखाद्या सुरेख फॉन्ट सारखं. एकसारखं, वळणदार..

बाबांशी संवाद साधायचा खूप प्रयत्न केला तिने. तिच्यापेक्षाही वयानं मोठ्ठ कुणीतरी मिळालं होत तिला आज. बाबा मात्र थोडे ओशाळल्यासारखे वाटले. त्या दोघांचा एकतर्फी संवाद मी मनापासून एन्जॉय केला. Margaret बोलत होती, ते नुसतीच मान हलवत होते. लहानपणापासून ते आतापर्यंत च्या तिच्या काही अनमोल आठवणी ताज्या केल्या होत्या तिने बाबांसोबत… ज्यांना ती काय बोलतेय हे तसूभरही समजत न्हवतं. एका क्षणी तर मी बाबांना डोळे चोळताना बघितलं. मी मात्र एक त्रयस्थ होते तिथे, तरी तिच्या त्या छोट्या जगात तिच्यासोबत एक सफर करून आले. नंतर थोडा वेळ तिचा Piano माझ्या मुलींनी वाजवून पाहिला. ती फक्त डोळे मिटून ते शांत ऐकत बसली होती.

रात्रीच्या जेवणाची तयारी होतीच आमच्याकडे बऱ्यापैकी. तिने मी रात्री फक्त सूप पिते हे आधीच सांगितलं होत. तरीही जेवताना न राहवून मी तिला विचारलंच “Would you like to try our food?”
“हो..का नाही?” असं म्हंटल्यावर थोडं घाबरतच मी तिला एका प्लेट मध्ये मेथीचा एक ठेपला, तोही तिखट खायला दिला. आश्चर्य म्हणजे Margaretने तो चवीचवीने खाल्ला. घटक पदार्थ विचारल्यावर मी तिला Fenugreek आणि मेथी हे दोन्ही शब्द सांगितले. तिने मेथी लक्षात ठेवला.

Margaret- मेथी पराठा खाताना

इलेक्ट्रिक ब्लॅंकेट मुळे मस्त उब आली होती गादीत. मुली आत शिरल्याशिरल्या गुडूप! मी वॉशरूम मध्ये गेले. एकच रूम बाथरूम आणि टॉयलेट मध्ये डिव्हाइड केली होती. बेसिन जवळ मार्गारेट ने ना चुकता एक नोट लिहून ठेवली होती. “टॉयलेटला फक्त सरकत दार आहे. वापरताना आत लाईट लावणे आवश्यक आहे. त्यामुळे इतरांना समजेल कि आत कोणीतरी आहे.”

बेसिनजवळची टिप

गादीवर पडल्या पडल्या Margaret ने विचार करायला भाग पाडलं. डोळे मिटले. वाटलं, वयाच्या ६५ व्या वर्षी असं जगता यावं. मुक्त तरीही बांधील.. स्वतःहूनच.. तिचं अक्षर, बोलणं, वागणं, राहणीमान सगळंच खूप साधं सरळ होतं. प्रत्येक गोष्ट अचूक नोंद करून ठेवण्याची कला होती तिच्याकडे. त्या छोट्या घरात आणि मोठ्या परिसरात रमवून घेतलं होतं तिने स्वतःला. ना कुठे एकटेपणाची खंत, ना कुठे उद्याची चिंता.. एकटी नव्हती तशी ती म्हणा. बाहेर चा निसर्ग, ती हरणं आणि ते शहामृग होतेच सोबत कायमचे.

फोनच्या विचित्र अलार्म मुळे खडबडून जागे झालो. सगळ्यांच्याच फ़ोनवर एकाच वेळी emergency मेसेज आला होता. Gore जवळून वाहणाऱ्या mataura नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली होती. काही जीवनावश्यक सामान बॅग मध्ये भरून evacuation साठी तयार रहा असा मेसेज होता तो.
मी आणि मुली आता मात्र घाबरलो. भराभर सामान आवरलं ,फ्रेश होऊन तयार झालो.

Margaret काही खोलीच्या बाहेर येईना . थोडा वेळ दारावर थाप मारल्यावर ही बाहेर आली निवांत आळस देत . तिचं आवरून झालंय हे पाहून मग आम्ही तिला तो मेसेज दाखवला. आमच्या अंदाजानुसार तिने लगबग करणं अपेक्षीत होतं. पण तसं काहीही झालं नाही. ही निवांत खुर्चीत रेलून बसली. हळूच गालात हसून म्हणाली, “ही काही पहिली वेळ नाही, या सुंदर जागेत रहायचं तर ही रिस्क आलीच. पूर आला तरी माझं घर उंचावर आहे. त्याला धोका नाही. मी कुठेही हलणार नाही. तुम्ही मात्र आता लवकर निघा रस्ते पूर्ण बंद व्हायच्या आत.”

मी अवाक होऊन तिच्याकडे पहात बसले काही क्षण! बाहेर पडताना Margaret दारापर्यंत सोडायला आली.
एक फोटो हवाय तुझ्यासोबत म्हंटल्यावर इतकी गोड़ लाजली.
बाबांशी पुन्हा तिच्या ब्रिटिश accent मध्ये दोन चार वाक्यं बोलली.
त्यांनी as usual नुसती मान हलवली. पुढचा प्रवासही खडतर झाला.

चिरतरुण Margaret

पण एक गोष्ट कायम मनात राहिली ती म्हणजे “Gore ची Margaret!!”

..शब्दशिल्प..

NOTE :

COVID-19 Related Government Imposed Restrictions Prevail At A Few Locations.
For More Details Get In Touch With Us At [email protected] Or Call Us At +91-9420213309

Scheduled Tours :

Batch No.DateStarting PointOccupancy

Follow us on :

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like